नवी दिल्ली : देशाच्या राजकिय वर्तुळातून सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या या निधनाने समाजवादी पक्षावर आणि राजकीय वर्तुळाच शोककळा पसरली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता. गेल्या ४ दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. साधना यादव या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. औषधे देऊनही परिस्थिती सुधारत नाही. मात्र उपचारा दरम्यानचं त्यांची प्राणज्योत मावळली.  


साधना गुप्ता गेल्या १५ दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रक्तदाबासह साखरेचा त्रासही होता, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्या अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मुलायमसिंह यादवही त्यांची सतत काळजी घेत होते. 


मुलायम सिंह यादव आज सकाळी पत्नीची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आज त्यांचे निधन झाले. दिल्लीहून चार्टर्ड विमानाने त्यांचे पार्थिव लखनौला नेण्यात येत आहे. जिथे कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित असतील.


कोण आहेत साधना गुप्ता?
साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. 1980 मध्ये ते पहिल्यांदा मुलायमसिंह यादव यांना भेटल्या होत्या. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. मात्र ते फार काळ टीकलं नाही, त्यामुळे चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यांच्यासोबत लग्न झाले, साधना गुप्ता मुलायम सिंह यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या. साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यांच्या मुलाचे नाव प्रतीक यादव आहे. अपर्णा यादव त्याची पत्नी आहे.