मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही जोखिम असते. परंतू तुम्हाला गुंतवणूकीसाठी योग्य शेअरची निवड करता आली तर, तुम्ही लाखो - कोट्यवधी रुपयांचा रिटर्न मिळवू शकता. शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर शेअर आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना मलामाल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक शेअर म्हणजे, रिलॅक्सो कंपनीचा शेअर होय. हा शेअर 0.89 रुपयांवरून 979 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 1.10 लाख टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, त्या गुंतवणूकदाराला 11 कोटी रुपये मिळाले असते.


52 आठवड्यांचा उच्चांक 


आम्ही ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल बोलत आहोत ती म्हणजे Relaxo Footwears.


Relaxo Footwears Limited च्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,448 रुपये आहे आणि या कालावधीतील निम्न पातळी 925 रुपये आहे. 


10 जानेवारी 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर हा स्टॉक 89 पैशांवर होता. आता हा शेअर 6 जुलै रोजी 979 रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे.


20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत भरघोस परतावा


जर एखाद्या व्यक्तीने 10 जानेवारी 2003 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि तर आज ते 11 कोटींवर गेले आहेत. हा परतावा पाहता या समभागाने ज्याप्रकारे जबरदस्त परतावा दिला आहे.