मुंबई : Multibagger Stock 2022: वर्ष 2021 मध्ये शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. परंतु तरीही बाजारात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एका शेअर म्हणजे Tata Teleservices Maharashtra Ltd. (Tata Teleservices Maharashtra Ltd) होय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा समूहाच्या या शेअरने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहे. टीटीएमएलच्या स्टॉकने गेल्या वर्षभरात जबरदस्त कामगिरी केली आहे.


सध्या, TTML (Tata Teleservices Maharashtra Ltd- TTML) चा शेअर सध्या 206 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. महिनाभरापूर्वी 2 डिसेंबरला तो 124 रुपयांवर होता. एका महिन्यात हा शेअर जवळपास दुप्पट झाला आहे.


एका वर्षात 26 पट  रिटर्न्स देणारा शेअर


गेल्या एक वर्षातील या शेअरचा रेकॉर्ड पाहता हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 206.35 रुपयांवर पोहोचला आहे. 


म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आता त्याला 26 लाख रुपयांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. गेल्या वर्षी जुलैमध्ये हा स्टॉक 54 रुपयांवर होता, तो आता 206 रुपयांवर आहे.