Return Machine Stock | तब्बल 7700 टक्के रिटर्न; या स्टॉकने पाडला पैशाचा पाऊस; आणखी गुंतवणूकीची संधी
शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची ओळख झाली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
नवी दिल्ली : शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉकची ओळख झाली तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. गेल्या काही वर्षात रिटर्न चार्टवर नजर टाकल्यास असे काही स्टॉक्स मिळतील की जे रिटर्न मशीन बनले आहेत. असाच एक शेअर आहे आरती इंडस्ट्रीज (Aarti Industries)या शेअरने 10 वर्षात गुंतवणूकदारांना 76 पट परतावा दिला आहे. म्हणजेच 7700 टक्के परतावा दिला आहे. बाजारात मोठी कामगिरी केल्यानंतरही हा शेअर आणखी उच्चांकी गाठण्याच्या तयारीत आहे.
10 वर्षात 25 हजाराचे बनले 20 लाख
गेल्या 10 वर्षाचा परतावा पाहिल्यास आरती इंडस्ट्रीजने साधारण 77 पट परतावा दिला आहे. 10 वर्षात या शेअरची किंमत 10 रुपयांवरून 920 रुपये इतकी झाली आहे. जर कोणी 10 वर्षापूर्वी 25 हजार रुपयांची गुंतवणूक या शेअरमध्ये केली असती तर, आज त्याचे 20 लाख रुपये झाले असते. सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या यादीमध्ये या शेअरचा सामावेश आहे.
शेअर आणखी उच्चांकी गाठण्याच्या तयारीत
ब्रोकरेज हाऊस शेअरखान आरती इंडस्ट्रीजच्या स्टॉकबाबत सकारात्मक आहे. या शेअरमध्ये 1155 रुपयांचे लक्ष ठेवत गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते कंपनीचे जून तिमाहीचे निकाल चांगले आहेत. ही स्पेशॅलिटी केमिकल सेग्मेंटमध्ये कंपनीची चांगली कामगिरी आहे.