Multibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा
दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी संयम हा एक महत्त्वाचा गुण आहे, कारण पैसा खरेदी-विक्रीसोबत दीर्घ काळासाठी स्टॉकमध्ये गुंतवणुकीतूनही येतो. दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे आणि त्यामुळे जोपर्यंत स्टॉकच्या गुंतवणूकीतून नफा मिळत राहील तोपर्यंत स्टॉक राखून ठेवणे. काही स्टॉक्सने मोठ्या प्रमाणात गुंतवणनूकदारांना परतावा दिला आहे. असे शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे.
Bajaj Finance
मल्टीबॅगर स्टॉक नोव्हेंबर 2011 मध्ये सुमारे 64 ते 65 रुपये इतका होता. तर एप्रिल 2010 मध्ये तो सुमारे 40 रुपये प्रति शेअर इतका होता.
NSE वर बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत आज 6780 रुपये आहे. अशाप्रकारे 10 ते 11 वर्षांच्या कालावधीत हा मल्टीबॅगर स्टॉक 100 पटीने वाढला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षांपूर्वी 40 रुपयांनी शेअर्स खरेदी करून 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे आज अंदाजे 1.69 कोटी झाले असते.
Avanti Feeds:
2021 मध्ये हा स्टॉक नॉन-परफॉर्मर राहिला आहे. कारण त्याने केवळ 4.20 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. गेल्या 11 वर्षांत, एप्रिल 2010 मधील सुमारे 60 रुपये प्रति शेअरवरून NSE वर प्रति शेअर 542.15 रुपयांवर गेला आहे.
म्हणजेच कालावधीत शेअरमध्ये सुमारे 338 पट वाढ झाली आहे.
तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 60 रुपयांनी शेअर खरेदी करून 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे आज 3.38 कोटी झाले असते.
Astral Limited:
2021 मध्ये मल्टीबॅगर शेअर्समध्ये समाविष्ट असलेला हा स्टॉक त्याच्या भागधारकांना वर्षभर उत्तम परतावा देत आहे.
या समभागाने आपल्या भागधारकांना सुमारे 64 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या एका वर्षात जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे.
एप्रिल 2010 मधील सुमारे 12 रुपये प्रति शेअर पातळीवरून आज NSE वर शेअर 45 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत सुमारे 179 पट वाढ झाली आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 79 कोटी झाले असते.
Deepak Nitrite:
दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत साधारण 988 रुपयांवरून 2103 रुपयांवर पोहचली. म्हणजेच एका वर्षात शेअर 112 टक्क्यांनी वाढले आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज त्याचे 17 कोटी झाले असते.
Vaibhav Global:
गेल्या सहा महिन्यांपासून या शेअरवर विक्रीचा दबाव आहे. परंतु, दीर्घकाळापर्यंत, त्याचा शेअरधारकांना उत्तम परतावा देण्याचा शेअरचा इतिहास आहे.
डिसेंबर 2010 मध्ये वैभव ग्लोबलचे शेअर्स जवळपास 50 रुपयांच्या पातळीवर होते आणि आज ते 523 रुपयांच्या पातळीवर आहे. या काळात जवळपास 116 पटीने वाढले आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 10 वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 16 कोटी झाले असते.