Bullet Train : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट, आयजी ड्रोनने मॉनिटरिंग
Mumbai - Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी आता अधिक गती येणार आहे. या कामाच्या मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोन लक्ष ठेवणार आहे मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
Mumbai - Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मॉनिटरिंगसाठी आयजी ड्रोनने करार केला आहे. ड्रोनने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. यामुळे आता बुलेट ट्रेनच्या कामाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सूरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न आहे. आता आयजी ड्रोन कंपनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचे रेग्यूलर मॉनिटरींग अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे करणार आहे. या कामासाठी अंत्यत सोफिस्टीकेटेड सेंसर असलेल्या अत्याधुनिक ड्रोनचा वापर होणार आहे. याच्यामाध्यमातून कामावर देखरेख ठेवण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामाचे निरीक्षण आघाडीच्या एंटरप्राइझ ड्रोन सोल्यूशन कंपनी IG ड्रोनद्वारे केले जाईल. आयजी ड्रोन कंपनीने वार्षिक करार केला आहे. बुलेट ट्रेन हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी एक आहे आणि IG ड्रोन त्याच्या यशात आणि देखभालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. कारण हा प्रकल्प यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तो न झाल्याने लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आणि या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सूरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2026 पर्यंत सुरु करण्याची योजना असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते. पहिल्या 5G तंत्राच्या आयजी ड्रोन स्कायहॉकचे उद्घाटन वैष्णव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी घोषणा केली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा मुंबई आणि अहमदाबाद शहरांदरम्यान बांधला जाणारा हाय-स्पीड रेल्वे मार्ग आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्याचा उद्देश प्रवासी आणि वस्तूंसाठी जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करून भारतातील वाहतुकीत क्रांती घडवून आणणे आहे.
हा प्रकल्प नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत सरकार आणि संबंधित राज्य सरकारांचा संयुक्त उपक्रम आहे. कॉरिडॉरसाठी अपेक्षित सर्वोच्च वेग 350 किमी/ताशीपर्यंत (220 mph) सेट करण्यात आला होता. आता आयजी ड्रोन अत्याधुनिक सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या स्वदेशी विकसित ड्रोनचा वापर करुन जमिनीवरील कामाच्या प्रगतीवर वेळोवेळी लक्ष ठेवले जाणार आहे. हे ड्रोन जास्तीत जास्त अचूकता आणि अचूकतेसह डेटा कॅप्चर करण्यासाठी प्रगत सेन्सरने सुसज्ज आहेत.
ड्रोन बांधकाम साइटच्या उच्च-रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करतील, ज्यावर आयजी वन प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरुन प्रक्रिया केली जाईल. सॉफ्टवेअर सखोल तांत्रिक अंतर्दृष्टी आणि विश्लेषणे प्रदान करेल जे प्रकल्पाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करेल. मार्गावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी 8 गुजरातमध्ये असतील. तर चार महाराष्ट्रात असणार आहेत. ठाण्यामार्गे हा मार्ग पुण्याला जोडण्याचा पर्याय खुला ठेवण्याचा हेतू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.