मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट आखल्याचा मोठा गौप्यस्फोट झालाय. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती एक ईमेल (Email) लागलाय. या मेलमध्ये 20 किलो आरडीएक्स असून हल्ल्याची योजनाही तयार झाल्याचं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच अतिरेक्यांच्या स्लीपर सेलचाही उल्लेख मेलमध्ये आहे. कट उघडकीस येऊ नये, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचंही मेल पाठवणाऱ्यानं म्हटलंय. यामुळे तपास यंत्रणा सावध झाल्या असून या कटाचा छडा लावण्यासाठी पथकं तयार करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 


मेल पाठवण्याऱ्याचे दहशतवाद्यांशी संबंध
या मेलनुसार हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेलमध्ये असं म्हटलं आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनेही  हा ई-मेल गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना पाठवला आहे. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला त्याची चौकशी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेकडे आला आहे.


सुरक्षा दलांना अलर्ट
पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आलं आहे. ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.