मुंबई : गेल्या वर्षी मुंबईतला वीज पुरवठा हा सायबर हल्ल्यामुळे खंडित झाला नव्हता तर मानवी चुकीमुळे हा प्रकार घडल्यानचं केंद्रीय उर्जामंत्री आर के सिंह यांनी म्हटलं आहे. सायबर हल्ल्याचं कारण केंद्राने फेटाळून लावलं आहे. वीजयंत्रणेतील बिघाड मानवी चुकीमुळेच झाला आहे. चीनच्या या हल्ल्यांमुळे मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे. दोन पथकांनी या वीज पुरवठाखंडित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला आहे . आज विधानसभेत हा अहवाल मांडला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज यंत्रणेवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबतचा अहवाल आज विधिमंडळात मांडणार आहे. अपयश झाकण्यासाठी ब्लॅकआऊटमागे चीनचा हात असल्याचा बोगस रिपोर्ट तयार केला. अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी अधिवेशनात केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे. 



गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला  मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. या वीज खंडित पुरवठ्यामागे चीनचा हल्ला असल्याचा दावा केला जात होता. मात्र वीजयंत्रणेतील बिघाड मानवी चुकीमुळेच झाल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचं स्पष्टीकर समोर आलं आहे. त्यांनी सायबर हल्ल्याचं कारण फेटाळलं आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांचा अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आज विधानसभेत मांडणार आहेत. यामुळे आत विधानसभेत गदारोळ होणार यात शंका नाही.