धक्कादायक : महिलाविरोधी गुन्ह्यांत मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर
एनसीआरबीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे.
मुंबई : देशातील कोणत्याच कोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शिवाय मुंबईत देखील महिला सुरक्षित नसल्याचं चित्र समोर आलं आहे. महिलाविरोधी गुन्ह्यांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीत मुंबई तिसऱ्या स्थानी असल्याचं स्पष्ट झालं आहे. एनसीआरबीच्या अहवालाच्या माध्यमातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे राजधानी दिल्ली याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीनं देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केला. धक्कादायक बाब म्हणजे उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे.
महिलांविरोधी गुन्हे -
दिल्ली - १२ हजार ९०२
मुंबई - ६ हजार ५१९
नागपूर - १ हजार १४४
एकूण गुन्हेगारी -
दिल्ली - ३ लाख ११ हजार ९२
चेन्नई - ७१ हजार ९४९
मुंबई - ६० हजार ८२३
दोषसिद्धी दर
उत्तर प्रदेश - ५५.२ टक्के
राजस्थान - ४५ टक्के
महाराष्ट्र - १३.७ टक्के