Viral Story : काही घटना या अशा असतात,ज्याच्यावर विश्वास ठेवणे देखील खुपच अवघड जाते. कारण त्या खुपच अनपेक्षित असतात.अशीच एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुमच्या देखील काळजाचा ठोका चुकणार आहे. या घटनेत एका प्रवाशाची 32000 फूट उंच विमानात (Airplane) अचानक तब्येत बिघडली होती. तो मृत्यूच्या दारात पोहोचला होता अशी त्याची अवस्था होती.मात्र एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले आहे. नेमके त्याचे प्राण कसे वाचले होते? हे जाणून घेऊयात. 


हे ही वाचा : 500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


विमानात तब्येत बिघडली


कोल्हापूरचा एक अभियंता विस्ताराच्या युके 957 क्रमांकाच्या विमानातून दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) असा प्रवास करत होता. या प्रवासा दरम्यान त्या अभियंताची अचानक तब्येत बिघडली होती. ही घटना एअर होस्टेसने (Air Hostes) पाहिल्यानंतर विमानात आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्याची घोषणा केली. तसेच विमानात कोणी डॉक्टर आहे का? असे देखील तिने विचारले होते. 


डॉक्टर देवासारखा आला 


एअरहोस्टेसने (Air Hostes) ही घोषणा करत असताना डॉक्टर (Doctor) निरंजन चव्हाण जेवत होते. मात्र त्यांनी जेवण अर्ध्यावर सोडत विमानाच्या मागील बाजूस धाव घेतली. यावेळी त्यांना सुशांत शेळके (31) हा तरूण अस्वस्थ अवस्थेत दिसला. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, शरीर थंड पडले होते आणि त्याने डोळे देखील फिरवले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला इतक्या उंचावर वाचवणे खुपच अवघड होते. 


 


हे ही वाचा : ATM मध्ये गेले आणि मालामाल झाले, घटनाक्रम वाचून आश्चर्याचा धक्का बसेल 


 


प्रकृतीत सुधारणा


डॉक्टर (Doctor) निरंजन चव्हाण यांनी सर्व पणाला लावत शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. केबिन क्रूला (Cabin Crew) ऑक्सिजन पुरवठा सुरु करण्याची सूचना केली. तसेच तरूणाच्या जीभेवर साखर ठेवली. त्याला फळाचा रस दिला. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी चव्हाण यांनी त्याच्या हाताला,दंडाना मसाज देखील केला. याचा परिणाम थोड्या वेळाने दिसू आला त्याचा रक्तदाब स्थिर झाला आणि सुशांतच्या प्रकृतीत सुधारणा झाली. 


डॉक्टरांचा रूग्णासोबत प्रवास


सुशांतची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण प्रवास त्याने डॉक्टरांच्या (Doctor) शेजारी बसून केला. त्यानंतर विमानतळावर उतरल्यानंतर त्याची वैद्यकीय पथकाने (Medical Team) तपासणी केली होती. आणि त्याला निगराणीखाली ठेवले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तो कोल्हापूरला परतला होता. 


दरम्यान जमीनीपासून 32000 फूट उंचावर जो डॉक्टर (Doctor) देवदुतासारखा धावून आला आहे, त्या डॉक्टरमुळेच इतक्या उंचावर तरूणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.हा घटनाक्रम वाचून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.