धारदार शस्त्राने वार करून कारमध्येच हत्या, घटनेनं शहरात खळबळ...
कारमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची घटना सुरत-नागपूर महामार्गावर घडली आहे.
नंदुरबार : सुरत-नागपूर महामार्गावर नवापूर शहराजवळ कारमध्ये धारदार शस्त्राने वार करून एकाची हत्या करण्यात आली आहे. गाडीचा क्रमांक जी जे 05 टी सी 0017 असा आहे. 40 ते 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गाडीत आढळून आला.
गाडीत मागच्या सीटवर प्लास्टिक टेपच्या साह्याने तोंड बाधून संपूर्ण शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. यामुळे नवापूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.