उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधल्या एका प्रेग्नेंट शिक्षिकेच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत पोलिसांनी एका टी-शर्टच्या प्रिंटवरून मारेकऱ्याचा शोध घेतलाय. या प्रकरणात पोलिसांनी एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीने का केली असेल एका प्रेग्नेंट शिक्षिकेची हत्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर वाचूयात ही मर्डर मिस्ट्री. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या अयोध्येत एका 5 महिन्यांच्या गर्भवती शिक्षिकेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील हत्येची घटना घरातल्या सीसीटीव्हीत कैद झाली होती. मात्र सीसीटीव्हीत फोटो क्लियर दिसत नसल्याने तरूणाची ओळख पटवण्यास उशीर होत होता.त्यामुळे पोलिसांनी त्याच्या टी-शर्ट वरून तपास सुरु केला. 


पोलिसांनी मुलाच्या टी-शर्टची प्रिंट घेतली आणि ऑनलाइन साइट्सपासून ते रेडिमेड स्टोअरपर्यंत कोणत्या ग्राहकाने अशा पॅटर्नचा टी-शर्ट खरेदी केला आहे, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. या तपासात 2 महिन्यांपूर्वी फ्लिपकार्टवरून एका महिला शिक्षिकेच्या घरी अशा प्रकारचा टी-शर्ट डिलिव्हरी करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांसाठी हे पहिले मोठे यश होते. याद्वारे पोलिसांनी बरेच पुरावे मिळवत आरोपीचा शोध लावला.


दरम्यान आरोपी सापडताचं तो टी-शर्ट त्याने पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता, त्यात रक्ताचे अंश सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलासोबत कठोर चौकशी करण्यास सुरुवात केली.  


आरोपीची कबूली 
आरोपी अल्पवयीन मुलाने आपले महिला शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती दिली.तसेच अल्पवयीन तरूणाला हे नाते संपवायचे होते, मात्र महिला शिक्षिका मान्य करत नव्हती. तिने त्याला बदनाम करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने महिला शिक्षिकेची चाकूने निर्घृण हत्या केल्याची कबूली दिली. 


असा रचला हत्येचा कट 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका अल्पवयीन प्रियकरावर संबंध तोडू नये म्हणून दबाव टाकत होती. यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन प्रियकराने तिला जीवे मारण्याचा कट रचला. 1 जून रोजी महिला शिक्षिका घरी एकटी असताना तिला भेटण्याच्या बहाण्याने तो तेथे गेला. महिला शिक्षिकेच्या घरात घुसताच त्याने तिच्यावर चाकूने सपा सप  वार करण्यास सुरुवात केली. तब्बल त्याने 24 वार करत तिची हत्या केली.यात महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. 
 
अयोध्येचे डीआयजी एपी सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपी हा १२वीचा विद्यार्थी आहे. मार्कशीटनुसार त्याचे वय साडे सतरा वर्षे आहे. मात्र, तो त्याच्या वयापेक्षा खूपच मोठा दिसतो. त्याचे मेडिकल करण्यात आले आहे. तो प्रौढ की अल्पवयीन हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले आहेत.