Crime news : एखादा व्यक्ती अचानक बेपत्ता होतो. तेव्हा त्याचा शोध घेणं खूप कठीण असतं. अनेक वर्ष अनेक व्यक्ती अजून ही सापडलेल्या नाहीत. त्यांच्यासोबत काय झालं हे त्याच्या जवळच्या व्यक्तींना माहित नाही. आजच श्रद्धा हत्याकांडाची ( Shraddha Murder case ) घटना समोर आली. ज्यामध्ये 6 महिन्यानंतर हत्येचा उलगडा झाला. उत्तर प्रदेशातून देखील एक अशीच घटना समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी झालेली हत्या नाट्यमय पद्धतीने उघड झाली. हत्येचं कारण समजल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कारण या बेपत्ता व्यक्तीचा खून दुसरं कोणी नाही तर त्याच्याच शेजाऱ्याने केला होता. खून केल्यानंतर त्याने मृतदेह स्वतःच्या घरात 7 फूट खड्डा खणून पुरला होता. पण या घटनेत ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा पत्नीला अटक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबादच्या सिकरोड गावातला हा धक्कादायक प्रकार 4 वर्षानंतर समोर आला. आरोपीच्या घरात खोदकाम केल्यानंतर मृतदेह सापडला. 2018 मध्ये चंद्रवीर बेपत्ता झाला होता. मात्र 4 वर्षांनंतर हत्येची घटना पुढे आली.


मयत चंद्रवीरची पत्नी सविता आणि शेजारी अरुण यांचे अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबधातून 28 सप्टेंबर 2018 रोजी अरुणने गोळी झाडून चंद्रवीरची हत्या केली. 4 दिवसांपूर्वी घरात खड्डा खोदून ठेवला होता. त्यात तो पूरला. मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून खोल खड्डा खोदण्यात आला होता. वरुन त्यावर प्लास्टर करण्यात आले. पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल, बादली आणि कुऱ्हाडही जप्त केली आहे.