Uttar Pradesh Sanskrit Board : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) आलेल्या एका बातमीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कधीकाळी द्वेशावरुन दंगली होत असल्या तरी सध्या देशात वेगळं वातावरण आहे हे या बातमीवरुन समोर आले आहे. एका मुस्लिम विद्यार्थ्याने संस्कृत परीक्षेत (Sanskrit Board) पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला आहे. लखनऊ येथील उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषद संचलित चंदौली येथील शाळेतील या विद्यार्थ्याने इतिहास रचला आहे. इंटरमिजिएटचा मोहम्मद इरफानने 82.72 टक्के गुण मिळवून संपूर्ण उत्तर प्रदेशातून पहिला क्रमांक पटकावला आहे. इरफानच्या या कामगिरीची खूप चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये एकच मुस्लिम विद्यार्थी


बुधवारी उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल लागला. काही वेळाने सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर मोहम्मद इरफान बारावीत पहिला आल्याचे कळलं. इरफानला बारावीच्या परीक्षेत 82.72 टक्के गुण मिळाले आहेत. तर गंगोत्री देवी ही दुसरी आली असून तिला 80.57 टक्के गुण मिळाले आहेत. तर दहावीच्या परीक्षेत बलिया जिल्ह्यातील आदित्यने 92.50 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये पहिल्या 20 मध्ये येणारा इरफान हा एकमेक विद्यार्थी आहे.


मजुरी करुन वडील चालवतात घर 


संस्कृत विषयात इरफानला  खूप कमी गुण मिळाले आहेत. मात्र इतर विषयात इरफाला इतर विषयांत चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे इरफान उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेने घेतलेल्या इंटरमिजिएट परीक्षेत संपूर्ण राज्यात पहिला आला आहे. इरफान हा उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील सकलदिहा तालुक्यातील जिंदापूर गावचा रहिवासी आहे.  इरफान गावापासून काही अंतरावर असलेल्या प्रभुपूर येथील श्री संपूर्णानंद संस्कृत माध्यमिक विद्यालयात शिकतो. इरफान हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील सलाउद्दीन हे मजुरी करून घर चालवतात.18 वर्षांचा इरफान एकुलता एक मुलगा आहे. 


इरफानच्या शाळेतील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, तो वाचन आणि लेखनात खूप हुशार मुलगा आहे आणि त्याचे हस्ताक्षर देखील खूप सुंदर आहे. इरफानच्या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी सांगितले की, ते इरफानच्या या यशाने खूप खूश आहेत. दुसरीकडे  मुलाने संस्कृत भाषा निवडली तेव्हा त्यांना काही अडचण आली का? असे त्याच्या वडिलांना विचारले असता त्यांनी नाही असे म्हटलं आहे.


"इरफानला संस्कृत शिकताना कोणतीही अडचण आली नाही. त्याने वेगळा विषय निवडला याचा मला आनंद झाला आणि मी त्याला प्रोत्साहन दिले. इरफानला या विषयात रस होता, म्हणून मी त्याला थांबवले नाही. पण या गोष्टीमुळे मला काही फरक पडत नाहीत," असे इरफानच्या वडिलांनी सांगितले.