मुस्लिम मुलीच्या लग्नपत्रिकेवर देव-देवताचे चित्र! बंधुभावाचे अनोखे उदाहरण Viral
एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्डावर भगवान गणेश आणि श्रीकृष्णाची छायाचित्रे छापून बंधुभावाचे अनोखे उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे.
Viral Hindu-Muslim Viral Marraige Card: हिंदू-मुस्लिम वाद, मारामारी, दगडफेक यांच्या बातम्या रोज येत असताना. परंतु दोन्ही समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. लग्नांमध्येही हिंदू मुस्लिमांना आमंत्रित करतात आणि मुस्लिम हिंदू मित्र आणि जवळच्या व्यक्तींना आमंत्रित करतात. परंतु याहूनही वेगळी घटना सध्या व्हायरल झाली आहे. मित्रत्व आणि बंधुभावाचे असेच एक उदाहरण उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबातून समोर आले आहे.
अनोखी लग्नपत्रिका
अमेठीतील तिलोई तहसील भागातील अल्लादिन गावात मुस्लिम कुटुंबातील मुलीची लग्नपत्रिका संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. कारण मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका हिंदू रितीरिवाजाप्रमाणे छापून घेतली आहे. मुलीचे लग्न मुस्लीम धर्माच्या रितीरिवाजानुसार होणार असले तरी कार्डे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे छापण्यात आली आहेत हे विशेष आहे.
मुस्लिम मुलीच्या लग्नपत्रिकेवर देव-देवताचे चित्र!
मुस्लीम मुलीच्या लग्नपत्रिकेवर गणेश आणि श्रीकृष्णाची छायाचित्रे आहेत, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. हिंदू देवांचे फोटो असलेले मुस्लिम मुलीच्या लग्नाचे हे कार्ड सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. बाहेरून, लग्नपत्रिकेवर हिंदू कुटुंबातील मुलीचे लग्न असल्याचे दिसते, परंतु कार्डच्या आत वधू, वर आणि नातेवाईकांची नावे मुस्लिम आहेत. कार्डवर लग्नाची तारीख 8 नोव्हेंबर अशी आहे.
का छापण्यात आली अशी पत्रिका?
व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेची चौकशी करताना समजले की, त्या व्यक्तीची मुलगी सायमा बानो हिचे लग्न रायबरेलीच्या महाराजगंज भागातील सेनपूर गावातील इरफानशी होणार होते. हिंदू बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही हिंदू रितीरिवाजानुसार लग्नपत्रिका छापल्या असल्याचे सांगितले. यातून त्याला हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा संदेश द्यायचा आहे.