Mutual Fund : 5 वर्षात चांगला रिटर्न देणारे हे 5 फंड, केवळ कमी पैशात जास्त फायदा
तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि आपली कमाई वाढवायची असेल तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) योग्य पर्याय आहे.
मुंबई : तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि आपली कमाई वाढवायची असेल तर म्युच्युअल फंड (Mutual Fund) योग्य पर्याय आहे. मात्र, शेअर बाजारातील ही जोखीम आहे. म्हणून विचार करुन गुंतवणूक करणे कधीही चांगले आहे. परंतु, जेव्हा थोड्या कालावधीसाठी पैसे कमविण्याचा विचार केला जातो, तेव्हा ते सर्वोत्कृष्ट साधन मानले जाते. त्याचवेळी, जर गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असेल तर चांगल्या रिटर्नची देखील हमी असते. जर आपल्याला गुंतवणूक सुरू करायची असेल तर आपणास जास्त पैशांची आवश्यकता नाही. एखादी व्यक्ती फक्त 500 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करू शकते.
इक्विटी म्यूचुअल फंड (Equity Mutual Fund (SIP)
विशेषत: नवीन गुंतवणूकदारांसाठी इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे (एसआयपी) चांगला पर्याय आहे. असे बरेच फंड आहेत ज्यांनी एका वर्षापासून शेवटच्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना चांगले पैसे मिळवले आहेत. यापैकी बहुतेक म्युच्युअल फंडनी 30 टक्क्यापर्यंत वार्षिक परतावा दिला आहे. एसआयपीमार्फत थेट इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये दरमहा छोटी गुंतवणूक करुन आपण पैसे कमवू शकता. अशा पाच लहान कॅप फंडांबद्दल तुम्ही जाणून घ्या, ज्यांनी गेल्या 5 वर्षात चांगले पैसे दिले आहेत.
SBI स्मॉल कॅप फंड
गुंतवणूक - 1 वर्ष, रिटर्न - 79.62 टक्के गुंतवणूक - 3 वर्षे, रिटर्न - 38 टक्के, गुंतवणूक - 5 वर्षे, रिटर्न - 25.1 टक्के, एसआयपी कितीपासून सुरू करावी: 500 रुपये
HDFC स्मॉल कॅप फंड
गुंतवणूक - 1 वर्ष, रिटर्न - 106.58 टक्के गुंतवणूक - 3 वर्षे, रिटर्न - 35.89 टक्के गुंतवणूक - 5 वर्षे, रिटर्न - 22.26 टक्के, एसआयपी कितीपासून सुरू करावी: 500 रुपये
कोटक स्मॉल कॅप फंड
गुंतवणूक - 1 वर्ष, रिटर्न - 110.99 टक्के रिटर्न - 3 वर्षे, रिटर्न - 47.19 टक्के रिटर्न - 5 वर्षे, रिटर्न - 27.42 टक्के, एसआयपी कितीपासून सुरू करावी: 1000 रुपये
अॅक्सिस स्मॉल कॅप फंड
गुंतवणूक - 1 वर्ष, रिटर्न - 89 टक्के गुंतवणूक - 3 वर्षे, रिटर्न - 41.74 टक्के गुंतवणूक - 5 वर्षे, रिटर्न: 28 टक्के, एसआयपी कितीपासून सुरू करावी: 1000 रुपये
क्वॉन्ट एक्टिव फंड
गुंतवणूक - 1 वर्ष, रिटर्न - 90.46 टक्के, गुंतवणूक - 3 वर्षे, रिटर्न - 46.32 टक्के, गुंतवणूक - 5 वर्षे, रिटर्न - 30.42 टक्के, एसआयपी कितीपासून सुरू करावी: 1000 रुपये