Mutual fund NFO | ICICI प्रुडेंशियलचा नवीन फंड, फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक शक्य
म्युचुअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंडने पीएसयू बॉंड प्लस एसडीएल 40 ते 60 इंडेक्स फंड लॉंच केला आहे.
मुंबई : म्युचुअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंडने पीएसयू बॉंड प्लस एसडीएल 40 ते 60 इंडेक्स फंड लॉंच केला आहे. (ICICI Prudential PSU Bond plus SDL 40:60 Index Fund)त्याचे सब्सक्रिप्शन 27 सप्टेंबरपर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. हा एक ओपन इंडेड टार्गेट मॅच्योरिटी इंडेक्स फंड आहे. या फंडची मॅच्योरिटी 30 सप्टेंबर 2027 ला होईल.
फंडची गुंतवणूक
ICICI प्रुडेंशियलच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ही एक इंडेक्स फंड स्किम आहे. निफ्टी 50 PSU बॉंड आणि SDL इंडेक्स बॉंडमध्ये गुंतवणूक करणार आहे. याचा अर्थ फंडचा 40 टक्के पैसा सरकारी कंपन्यांचे बॉंड्स आणि 60 टक्के SDL मध्ये लावण्यात येणार आहे.
8AAA रेटेड PSU बॉंड्स
या स्किमध्ये 8AAA रेटेड PSU बॉंड्स असतील. हा एक डायवर्सिफाइड पोर्टफोलियो असणार आहे. यामध्ये टॉप 20 स्टेट लोन डेवलपमेंटचा पोर्टफोलियो असणार आहे. कंपन्यांची रेटिंगमध्ये AAAसर्वात मजबूत मानले जाते.
स्किमच्या 3 विशेष गोष्टी
ही एक ओपन इंडेड स्किम आहे. यामध्ये लॉक इन पीरियड नाही. ज्यामध्ये तुम्ही हवे तेव्हा पैसे काढू किंवा डिपॉजिट करू शकता.
जर तुम्ही 36 महिन्यांपेक्षा अधिकवेळ स्किममध्ये राहिलात तर 20 टक्के दराने टेकस लागू होईल.
यामध्ये सरचार्ज आणि सेस वेगळा लागू होईल. ही स्किम मीडियम टर्म टार्गेट पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
SIP चा पर्याय
आयसीआयसीआय प्रुडेंशियलच्या या स्किममध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. यामध्ये डेली, विकली, फोर्टनाइटली आणि मासिक एसआयपी अमाउंट 500 रुपये आहे. तिमाही एसआयपी अमाउंट 1000 रुपये आहे.