म्युच्युअल फंडातली गुंतवणुक विक्रमी पातळीवर !
गुंतवणुकदारांनी गेल्या महिन्यात तब्बल 1.26 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडात ओतली आहे.
नवी दिल्ली : गुंतवणुकदारांनी गेल्या महिन्यात तब्बल 1.26 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडात ओतली आहे.
गुंतवणुकदारांची विक्रमी गुंतवणुक
ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडात 51,000 कोटींची गुंतवणुक झाली होती. नोव्हेंबरमध्ये मात्र गुंतवणुकदारांनी विक्रमी गुंतवणुक केली आहे. यामुळे म्युच्युअल फंडातली गुंतवणुक आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पातळीवर म्हणजेच 21.8 लाख कोटींवर पोहोचली आहे.
उत्तम आर्थिक वाढ अपेक्षित
सरकारकडून मोठ्या प्रमाणात झालेल्या सुधारणांच्या घोषणा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना सरकारने केलेला भांडवली पुरवठा, भारतमाला प्रकल्प यामुळे येत्या 2-3 वर्षांत उत्तम आर्थिक वाढ अपेक्षित आहे. त्यातच मुडीजने वाढवलेल्या पतमानांकनाने गुंतवणुकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, असं मत बजाज कॅपिटलचे सीईओ राहुल पारीख यांनी व्यक्त केलंय.
तरूण वर्गासाठी एक उत्तम पर्याय
रिअल ईस्टेट आणि सोन्याचे पडलेले भाव, तसंच व्याजदरात झालेली घट यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांचा ओढा हा आता पारंपारीक गुंतवणुक साधनांकडून वळून म्युच्युअल फंडासारख्या बाजाराभिमुख पर्यायांकडे जायला आहे. नव्यानेच नोकरीत लागलेल्या तरूण वर्गासाठी हा एक उत्तम पर्याय असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.