मुंबई : टाटा ग्रुपच्या शेअर्ससाठी मागील 1 वर्ष मोठ्या फायद्याचे ठरले आहे. ग्रुपच्या हॅवीवेट कंपन्या असो किंवा स्मॉलकॅप कंपन्या बहुतांश कंपन्यांनी दमदार नफा मिळवला आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडने मोठी खरेदी केली आहे. कंपनीने हिस्सेदारी जून तिमाहीच्या तुलनेत वाढवली आहे. तर काही शेअर्समध्ये कमी केली आहे. ज्या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडने हिस्सेदारी वाढवली आहे. त्यातील 2 शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा सामिल आहे. 


या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडची वाढली हिस्सेदारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Titan Company 
या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार म्युच्युअल फंडमध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. जून तिमाहीमध्ये जेथे म्युच्युअल फंडची हिस्सेदारी 4.03 टक्के होती. ती सप्टेंबर 2021 मध्ये वाढून 4.19 टक्के झाली आहे. या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 18.41 टक्क्यांनी वाढून 19.06 टक्के केली आहे. 


TCS
TCS चा शेअर देखील म्युच्युअल फंडच्या टॉप लिस्टमध्ये सामिल आहे. सप्टेंबर तिमाहीच्या शेवटापर्यंत शेअर्समध्ये म्युच्युअल फंडची हिस्सेदारी 3.11 टक्के झाली आहे. जी जून तिमाहीमध्ये 2.96 टक्के इतकीच होती. परकीय गुंतवणूकदारांनी या शेअर्समधील हिस्सेदारी कमी केली आहे. 


Tata Chemicals
टाटा केमिकल्समध्ये म्युच्युअल फंडची हिस्सेदारी जून तिमाहीच्या 6.46 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये 8.34 टक्के झाली आहे. हा शेअर परकीय गुंतवणूकदारांच्याही रडारवर आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये त्यांची हिस्सेदारी 14.28 टक्क्यांनी कमी करून 13.35 टक्के केली आहे.


Tata Motors
टाटा मोटर्समध्ये सप्टेंबर तिमाहीमध्ये म्युच्युअल फंड्सने हिस्सेदारी वाढवून 6.05 टक्के इतकी केली आहे. ही हिस्सेदारी जून तिमाहीमध्ये 5.78 टक्के होती. 


या शेअर्सच्या गुंतवणूकीत कपात


Tata Communications, Indian Hotels, Tata Steel या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडने गुंतवणूक कमी केली आहे. 


दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनी आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सवर विश्वास कायम ठेवला आहे.


तर टाटा कम्युनिकेशन आणि इंडियन हॉटेल्स हे शेअर्स नव्याने पोर्टफोलिओमध्ये सामिल केले आहेत.