लग्नात वडिलांनी हुंडा दिलाय, मी जेवण बनवणार नाही; पत्नीने पतीला ठणकावले
Husband And Wife news: पती-पत्नीमध्ये एका अजब गोष्टीवरुन वाद होत आहे. पत्नीचा तर्क ऐकून पतीने थेट तक्रार दाखल केली आहे.
Dispute In Husband And Wife: नवरा-बायकोमध्ये (Husband And Wife) होणारी भांडणे काही नवीन आहे. अगदी छोट्यांशा गोष्टींवरुनही पती-पत्नींमध्ये (Husband Wife Dispute) कडाक्याचे भांडण होत असतात. अशीच एक आगळा-वेगळा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. माझ्या वडिलांनी भरपूर हुंडा (dowry) दिला आहे, त्यामुळं मी जेवण बनवणार नाही, अशी भूमिका एका महिलेने घेतली आहे. महिलेच्या या भूमिकेमुळं सासरचे मात्र गोंधळले आहेत.
पती-पत्नीमध्ये वाद
महिलेच्या या भूमिकेमुळं पती-पत्नीमधील वाद अधिक वाढला आहे. त्यानंतर पत्नीने पती व सासरच्यांविरोधात हुंडाबळीची तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पती आणि पत्नी यांना कौटुंबिक वाद तक्रार निवारण केंद्रात काउन्सलिंगसाठी बोलवण्यात आलं आहे. दोघांचंही काउन्सलिंग सध्या सुरू आहे.
पतीची पत्नीविरोधात तक्रार
पतीने केलेल्या तक्रारीनुसार, त्याची पत्नी घरात कोणतेच काम करत नव्हती. ती जेवणदेखील बनवत नव्हती. यावरुन तिला काही बोलल्यावर ती वाद घालायची. पतीच्या तक्रारीनंतर समुपदेशकाने महिलेसोबत चर्चा केली. त्यावेळी तिने स्पष्टपणे म्हटलं आहे की, तिच्या वडिलांनी लग्नात भरपूर हुंडा दिला आहे. मला जेवण बनवता येत नाही. पती आणि सासूसाठी मी जेवण बनवणार नाही.
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, पुणेकर आजोबांनी स्वतःचं आयुष्य संपवलं
'वडिलांनी दिला भरपूर हुंडा'
महिलेने समुपदेशकाला सांगितलं आहे की, ती घरातल कोणतच काम करणार नाही. माझ्या सासरी वडिलांनी भरपुर हुंडा दिला आहे. त्यात मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी घरात कामवाली ठेवावी. महिलेचे हे अजब तर्क ऐकून समुपदेशकही चक्रावला आहे. महिलेला समजावून सांगता सांगता त्यालाही नाकीनऊ आले आहेत.
अजब तर्क ऐकून समुपदेशकही चक्रावले
समुपदेशकाने दोन्ही पक्षाकडील दावे-प्रतिदावे ऐकल्यानंतर आता त्यांना पुढील आठवड्यात बोलवले आहे. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. पतीचा आरोप आहे की, पत्नी घरातील कोणतेच काम करत नाही. संपूर्ण दिवस ती फोनवर बोलत असते. यावर समुपदेशकांना तिला समजवून सांगण्याचे मोठे आवाहन आहे.
नादुरुस्त शिवशाहीमध्ये चालकाने संपवले आयुष्य; आता समोर आले खळबळ उडवणारे कारण, महिला वाहक...
पती-पत्नी आहेत उच्च शिक्षित
महिलेचे लग्न जवळपास तीन वर्षांपूर्वी झाले होते. महिलेचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. तर, दोघे पती-पत्नी उच्च शिक्षित आहेत. मात्र, घरातील कामे करण्यावरुन दोघांमध्ये वाद-विवाद आहेत.
मित्र असता तर...; आरोपी साहिलबद्दल पहिल्यांदाच बोलले पिडीतेचे वडिल