मुंबई : कोविडचा गेले जवळपास 2 वर्षांपासून आपण सामना करतोय. कोविड हे नावंही आता आपल्याला ऐकावसं वाटतं नाहीये. मग त्या व्यक्तीचा विचार करा ज्याचं नावंच कोविड आहे. होय...एक अशी व्यक्ती आहे ज्याचं नाव कोविड आहे. आणि इतर लोकंही त्याला कोविड याच नावाने हाक मारतात.


Holidify चे को-फाऊंडर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविडची महामारी येण्यापूर्वी या व्यक्तीचं जीवन सामान्य माणसांसारखं होतं. मात्र या महामारीमुळे जग दहशतीखाली आल्यानंतर आता त्यांच्या आयुष्यालाही आक वेगळंच वळण आलंय. ट्रॅव्हल अॅप Holidify चे सह-संस्थापक कोविद कपूर यांची ही कहाणी आहे. नुकतीच त्यांनी ट्विटरवर आपली ही कहाणी शेअर केलीये.



खरंतर काही दिवसांपूर्वी ते परदेश दौऱ्यावर होते. यादरम्यान काही लोकांनी त्याच्या नावाची खिल्ली उडवली तर काहींनी नाव ऐकताच हसायला सुरुवात केली. हा अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 


ट्विटमध्ये त्यांनी आपलं नाव हनुमान चालिसेवरून घेतल्याचं सांगितलंय. हनुमान चालिसात एक ओळ आहे - कवी कोविद कही सके कहाँ ते. कोविद हा शब्द या ओळीतून घेण्यात आला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये Kovid असं लिहिलं जातं. Kovid म्हणजे विद्वान. तेव्हापासून त्यांचे हे ट्विट जोरदार व्हायरल होतंय.


यांतर आता त्यांनी ट्विटर बायोही बदललं आहे. त्यांनी लिहिलंय आहे- "माझं नाव कोविद आहे आणि मी व्हायरस नाही." त्याने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये गुगलवर Kovid टाईप केल्यावर, गुगल त्यांना सजेशनमध्ये Covid टाइप करण्याचा सल्ला येतो.


वाढदिवसाच्या केकवर लिहिलं Covid


कोविद यांनी 30व्या वाढदिवसाच्या केकचा फोटो शेअर केलाय. यामध्ये त्यांच्या मित्रांनी वाढदिवसाच्या केकवर त्यांचं नाव Covid-30 असं लिहिलेलं दिसतंय.


कोविद म्हणतात की, या सर्वाची त्याला फार गंमत वाटतेय. मी सेलिब्रिटी झालोय असं वाटतंय. माझी मुलाखत घेतली जात असून माझी चौकशी केली जातेय.