मुंबई : असे अनेक किल्ले आजही आपल्या देशात आहेत जे रहस्यमयी किल्ले म्हणून ओळखले जातात. यापैकी एक किल्ला म्हणजे गडकुंदरचा किल्ला. हा किल्ला देशातील सर्वात रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो. गडकुंदर किल्ला उत्तर प्रदेशातील झाशी शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किल्ला 11व्या शतकात बांधला गेला होता. हा किल्ला जवळपास पाच मजली आहे. ज्याचे तीन मजले वर आणि दोन मजले भूमिगत आहेत. हा किल्ला केव्हा बांधला आणि कोणी बांधला याची काहीही माहिती नाही. पण हा किल्ला 1500 ते 2000 वर्षे जुना असल्याचं मानलं जातं.


सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधलेला हा किल्ला लोकांचा भ्रमनिरास करतो. हा किल्ला चार ते पाच किलोमीटर अंतरावरून दिसतो अशा पद्धतीने बांधण्यात आलाय. पण जवळ येताच तो दिसत नाही, असा अनेकांनी दावा केला आहे. ज्या वाटेने किल्ला दुरून दिसतो, त्याच वाटेवरून आ ल्यास वाट किल्ल्याऐवजी दुसरीकडे जाते, तर गडावर जाण्यासाठी दुसरी वाट आहे.


हा किल्ला देशातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांमध्ये गणला जातो. स्थानिक लोक सांगतात की, खूप वर्षांपूर्वी जवळच्या गावात वरात आली होती. हा गड पाहण्यासाठी लोकं गेले. हिंडत असताना ते लोक तळघरात गेले, त्यानंतर ते रहस्यमयरीत्या अचानक गायब झाले. आजपर्यंत या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 50-60 जणांचा पत्ता सापडलेला नाही. 


गडकुंदरचा किल्ला भुलभुलैया पेक्षा कमी नाहीये. या गडावर जाणारे लोक अनेकदा भरकटतात. या किल्ल्यावर दिवसाही अंधार असतो, त्यामुळे लोक दिवसाही जाण्यास टाळाटाळ करतात. या किल्ल्यात खजिन्याचं रहस्य दडलंय, असं मानलं जात. ते शोधण्यासाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.