Viral News : वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पोलिसांकडून कायमच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. कुठल्याही संशयास्पद वस्तू (suspicious item) आढळून आल्यास माहिती देण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जातात. अशातच सतर्क नागरिकांकडून ही अशा अज्ञात वस्तूंबाबत पोलिसांनी तात्काळ सूचना दिल्या जातात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात घडलाय. गावकऱ्यांनी जंगलात सापडलेल्या अज्ञात वस्तूबाबत पोलिसांना माहिती दिली आणि भलतचं काही तरी समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या एका गावात हा सर्व प्रकार समोर आलाय. जंगलात गावकऱ्यांना काही गोळे सापडले होते. ही माहिती गावासह संपूर्ण कानपूरमध्ये पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अॅक्शन घेतली आणि तपास सुरु केला.


एका पत्रकाराने ही अज्ञात गोळ्यांचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केली. कानपूरच्या बिल्हौर गावात अंड्याच्या आकाराचे गोळे सापडले. यामुळे गावकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरु आहेत.पोलिसांनी याप्रकरणी धक्कादायक खुलासा केलाय. "यामध्ये संशयास्पद काहीही नाही. ही प्राण्याची विष्ठा आहे," असा खुलासा पोलिसांनी ट्विटद्वारे केलाय. कानपूर आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलय. यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.



डायनासॉरची विष्ठा असेल



ये तो टट्टी है!



या आकाराची विष्ठा पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झालेत. त्यामुळे ही नक्की कोणत्या प्राण्याची विष्ठा आहे याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरुय.