गुवाहाटी: आता देशातील सर्वात मोठी बातमी आहे. नागालँडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्याच्या ओटिंग गावात ही घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हशतवादी समजून केलेल्या गोळीबारात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी जवानांची गाडी पेटवली. या घटनेचा तपास करण्यासाठी नागालँड सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. दुर्दैवी घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.



या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या जाळल्या. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. त्याचवेळी नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केलं आहे. या घटनेचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करणार असल्याचे सांगितले.


नागालँडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या भागात सध्या वातावरण तापल्याने नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी शांतता राखण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं आहे.