Exit Polls: एक्झिट पोल म्हणजे काय असतं? ओपिनियन पोल वेगळं असतं का? जाणून घ्या एका क्लिकवर!
Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023: सेव्हन सिस्टर्समधील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मात्र, एक्झिट पोल म्हणजे काय असतं? तुम्हाली माहिती असली पाहिली.
Nagaland Tripura Meghalaya Exit Poll 2023: ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly elections 2023) मतदान संपलं आहे आणि मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचे निकाल येत्या 2 मार्च 2023 रोजी घोषित केला जातील. निकाल जरी चार दिवसांनी लागणार असला तरी एक्झिट पोल (Exit Poll) आता समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोल शब्द अनेकदा ऐकला असेल. परंतू एक्झिट पोल म्हणजे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (What is an exit poll How is it prepared Know the detail in marathi)
एक्झिट पोल म्हणजे काय? (What is an exit poll?)
निवडणूक निकालाचे अंदाज (Predictions of election results) व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणजे एक्झिट पोल. या एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणाची सत्ता येईल? याचा अंदाज लावला जातो, त्याला एक्झिट पोल म्हटलं जातं. एक्झिट पोल हा तंतोतंत असतो. मात्र, हा खरा निकाल असू शकत नाही. एकंदरीत ट्रेंड कोणत्या बाजूला झुकला आहे, याचा अंदाज घेण्यातचं एक माध्यम म्हणजे एक्झिट पोल.
एग्झिट पोल कधी जाहीर केला जातो? (When the exit poll announced?)
भारतात अनेकदा साधारण दोन ते तीन टप्प्यात मतदान पार पडतं. भारतात मतदान झाल्यानंतर एग्झिट पोल जाहीर करण्याची परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एग्झिट पोल जाहीर केला जातो.
एक्झिट पोल तयार कसे करतात? (How do create an exit poll?)
माध्यम समुह आणि स्वायत्त संस्था यांचा एक प्रतिनिधी काही निवडणूक केंद्राबाहेर असतात. काही मतदारांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून मतदानाबद्दल माहिती घेतात. असे अनेक कल जाणून घेतल्यानंतर संपूर्ण डेटा मोठ्या स्केलवर मोजला जातो. त्यानुसार निकाल कसा लागेल, याचा अंदाज लावला जातो.
कायदा काय सांगतो? (What does the law say?)
लोकप्रतिनिधी कायदा, 19951 नुसार निवडणूक आयोगाने (ECI) अधिसूचित जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम एक्झिट पोल जाहीर करू शकत नाही. या कायद्याचं उल्लंघन केल्यास, त्या वय्क्तीला दोन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
ओपिनियन पोल म्हणजे काय? (Exit Poll vs Opinion Poll)
ओपिनियन पोल (Opinion Poll) म्हणजे जनमत चाचणी असते. यामध्ये विविध भागातील मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला जाऊ शकतो. मतदारांचा कौल जाणून घेऊन मोठ्या पातळीवर डेटा गोळा केला जातो आणि एक विशिष्ट चित्र तयार होतं.