अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या भारत दौऱ्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. अतिशय उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी ट्रम्प यांच्यासह त्यांच्या परिवाराचंही स्वागत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानतळावरील अतिशय उत्साही स्वागतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या गाड्यांचा तापा साबरमती आश्रमाच्या दिशेने निघाला. साबरमती आश्रमातही त्यांचं सहृदय स्वागत केलं गेलं. जेथे ट्रम्प यांनी त्यांच्या पत्नीसह आश्रमाबाबतची माहिती घेतली. शिवाय आश्रमात त्यांची चरखा चालवत सूतकताईसुद्धा केली.


भारतासाठी अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या साबरमती आश्रमात काही क्षण व्यतीत केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचे अभिप्रायही तेथे एका वहीत लिहिले. 'माझ्या अतिशय चांगल्या मित्रास.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांस; या सुरेख भेटीसाठी मी तुमचा आभारी आहे', असं लिहित त्यांनी आपल्या स्वाक्षरीसह अभिप्राय लिहिलं. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांनीही यावेळी त्यांचं अभिप्राय लिहिलं. 



#TrumpInIndia : डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरही धडाकेबाज स्वागत


साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियमच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रचंड गर्दी, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं टप्प्याटप्प्यावर स्वागत करण्य़ात आलं. दोन दिवसीय भारत दौऱ्यामध्ये ट्रम्प हे विविध राजकीय मंडळींची भेट घेणार आहेत. शिवाय ते आग्र्यातील ताजमहालालाही भेट देणार आहेत. भारतासोबतच साऱ्य़ा देशाचं लक्ष ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्याकडे लागलं आहे. तेव्हा आता या भेटीविषयी खुद्द ट्रम्प काय म्हणतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.