दिल्लीत राणे आणि भाजप नेत्यांमध्ये खलबतं आणि वाटाघाटी
दिल्लीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे दिल्लीत तळ ठोकून आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे दिल्लीत तळ ठोकून आहेत.
दरम्यान नारायण राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी भेट होण्याआधी, दिल्लीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी, नारायण राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यात बैठक सुरू आहे.
या तीनही नेत्यांमध्ये नारायण राणेंच्य़ा पक्ष प्रवेशावर खलबतं सुरू आहेत. या बैठकीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता आहे. नारायण राणे आणि अमित शहा यांची अद्याप भेट झालेली नाही. या बैठकीनंतर अमित शहा आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.