रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : नारायण राणे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या घरी दाखल झाले आहेत, रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतल्या घरी बैठक संपवल्यानंतर नारायण राणे दिल्लीत अमित शहा यांच्या घरी पोहोचले आहेत. तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीत नारायण राणे यांचे मुद्दे समजवून दिले जातील, त्याच्यावर विचार झाल्यानंतर, अमित शहा आणि नारायण राणे यांच्यात बैठक होणार आहे. नारायण राणे यांची अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर नारायण राणे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे किंवा नाही, हे समजणार आहे.


नारायण राणे यांच्या प्रवेशासाठी दिल्लीत अमित शहांच्या घरी या दोन वेगवेगळ्या बैठकी होणार आहेत. अमित शहा, चंद्रकांतदादा पाटील आणि रावसाहेब दानवे यांची पहिली बैठक याच्यानंतर, अमित शहा आणि नारायण राणे यांची बैठक, या बैठकीकडे सर्वांची नजर लागून आहे.