नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी आपला 70वा वाढदिवस साजरा केला. जगभरातून अनेकांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही मोदींच्या वाढदिवसानिमित्त ट्रेंड सुरु होता. अनेक चाहत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्नही विचारला होता. मोदींनी चाहत्यांच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देत, त्यांना काय गिफ्ट हवं, याची लिस्ट सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधांनी ट्विट करत वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आहे. 'अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याची विचारणा केली होती, मी मला हव्या असलेल्या गोष्टी सांगतो. सर्वांनी मास्क घाला आणि ते योग्यरित्या घाला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. दो गज की दूरी नेहमी लक्षात ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. स्वत:ची इम्युनिटी वाढवा आणि आपण सर्व मिळून आपलं जग स्वस्थ-निरोगी बनवूया' असं ट्विट करत मोदींनी आपल्या वाढदिवसाची विश लिस्ट सांगत, हेच गिफ्ट सर्वांकडे मागितलं आहे.



मोदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. 'सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला जनतेची सेवा करण्याची आणि जनतेचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेने काम करण्याची शक्ती मिळत असल्याचंही' मोदींनी सांगितलं.



पंतप्रधान मोदींना जगभरातून अनेक नेत्यांची वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रशियाचे राष्ट्रपती क्वादिमीर पुतिन, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. तसंच पुतिन यांनी मोदींना पत्र लिहून त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसाही केली.