नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीत त्यांनी अत्यंत भावूक होत गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या मारहाणीच्या घटनांवर टीका केली. 


 १० वर्षं भाजप सत्तेत राहणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढली १० वर्षं भाजप सत्तेत राहील, असे असा दावा कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणा मोदी यांनी केला. त्यामुळे त्यांचा दौरा हा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा आहे हा, अशी शंका उपस्थित होत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौ-यावर आले आहेत. साबरमती आश्रमाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी मोदींनी साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन केलं. 


मोदींनी चरखा चालवत सूतही कातलं


तसंच मोदींनी स्वतः चरखा चालवत सूतही कातलं. यानंतर आश्रमात मोदींनी वृक्षारोपणही केलं. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात मोदींनी टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचंही अनावरण केलं. 


 हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटत नाही!


साबरमती आश्रमाच्या शताब्दी वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अहिंसेचा संदेश दिलाय. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणं, कायदा हातात घेणं हे मंजूर नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना सुनावलंय. हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटले नाही आणि सुटणार नाहीत असंही पंतप्रधान म्हणालेत.


मोदींनी बालपणीची आठवण जागवली


महात्मा गांधींना हे मान्य नव्हते आणि गांधींजींच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहनही मोदींनी केलंय. यावेळी आपल्या बालपणीची आठवण सांगताना मोदी भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपनं गुजरात निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जातंय. संध्याकाळी होणा-या मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे.