VIDEO | मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली; व्हीडीओ व्हायरल
एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बीजापूर : पीएम नरेंद्र मोदी शनिवारी छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर पीएम नरेंद्र मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पीएम नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील.
पहिल्यांदा बीजापूर आदिवासी जिल्ह्याला भेट
नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, जे पहिल्यांदा आदिवासी जिल्हा बीजापूरमध्ये आले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा छत्तीसगडमध्ये चौथा दौरा आहे. छत्तीसगडमध्ये या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. पंतप्रधान मे २०१५ मध्ये दंतेवाडा, फेब्रुवारी २०१६ मध्ये, रायपूर आणि राजनंदगावं आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये रायपूरला आले होते.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयुष्यमान भारत योजनेनुसार पहिल्या आरोग्य केंद्राचं उद्धघाटन केलं. पंतप्रधानांनी नक्षल प्रभावित जिल्ह्यातील स्थानिक चॅम्पियन्स ऑफ चेन्ज यांच्याशीही चर्चा केली.