नवी दिल्ली : दिल्लीच्या विकासामध्ये मोदी सरकार अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. दिल्लीत आपच्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. दिल्लीतले सात खासदार निवडून दिल्यास संसदेत दिल्लीकरांची बाजू मांडता येईल, असेही केजरीवाल म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते आणि उमेदवार आता देवळांचे उंबरठेही झिजवू लागलेत. दिल्लीतील आपच्या उमेदवार आतिशी यांनी प्रचारादरम्यान मंदिरात देवी देवतांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवळात आलेल्या भाविकांशीही संवाद साधला. आतिषी या आपच्या उमेदवार असून त्या दिल्लीतून निवडणूक लढवतायत.



माजी क्रिकेटर आणि भाजपाकडून निवडणूक लढवणारे गौतम गंभीर यांच्या दोन मतदान ओळखपत्राबाबत दिल्ली न्यायालयाने तक्रारकर्ते आणि आपचे नेत्या आतिशी मार्लेना यांना कागदपत्र आणि माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारकर्त्यांनी कोणत्या आधारे ही तक्रार केली आहे असा सवालही न्यायाल्यानं दाखल केला आहे.