नवी दिल्ली : देशातला रोजगार वाढवण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना घेऊन आली आहे. केंद्र सरकारनं रोजगार सृजन कार्यक्रम (पीएमईजीपी) योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आठवी पास असणाऱ्यांनाही १० लाख रुपये कर्ज म्हणून मिळणार आहे. पण ही रक्कम स्वयंरोजगार सुरु करण्यासाठीच वापरता येणार आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगाराचं प्रोजेक्ट तयार करून कर्जासाठी निवेदन द्यावं लागणार आहे. हे प्रोजेक्ट मंजूर झाल्यावर सरकारकडून खादी ग्रामोद्योग कर्ज देईल. या योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी युवकांना घेता येणार आहे.


केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, इशान्य भारतातले नागरिक यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ स्वयं सहाय्यता समूह, सोसायटी आणि चॅरिटेबल ट्रस्टनाही घेता येणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.