Narendra Modi : `नरेंद्र मोदी आजन्म पंतप्रधान राहू शकतात`
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणीही स्पर्धा करू शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आयुष्यभर पंतप्रधान (Prime Minister) राहू शकतात, असे विधान उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) सरकारमध्ये माध्यमिक शिक्षण मंत्री असणाऱ्या गुलाब देवी (gulab devi) यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे देवाच्या अवतारासारखे आहेत. त्यांच्या तोंडून जे शब्द निघतात त्यावर संपूर्ण भारताचा विश्वास आहे, असेही गुलाब देवी (gulab devi) म्हणाल्या. श्री गणेश चौथ उत्सवाचे संस्थापक डॉ. गिरीराज किशोर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यासाठी गुलाब देवी बुधवारी संभल जिल्ह्यातील चांदौसी विधानसभा मतदारसंघात पोहोचल्या होत्या. तिथे बोलत असताना गुलाब देवी यांनी हे वक्तव्य केले आहे. (Narendra Modi is an incarnation of God remain PM for whole life says UP minister Gulab Devi)
"माननीय पंतप्रधान मोदी हे अवतार आहेत. ते विलक्षण असे अवतार आहेत. त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. त्यांची इच्छा असल्यास, जोपर्यंत त्यांचे आयुष्य आहे, तोपर्यंत ते पंतप्रधान असतील. यामुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार होणार नाहीत. त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती येणार नाही. अनुमानाने काही होत नाही. ते एक विलक्षण व्यक्तिमत्व आहेत. मी म्हणेन की ते अवतार आहेत. देवाने त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून इथे पाठवले आहे. त्याला हवं तेव्हा त्याला हवं ते मिळतं. मग हे सर्व काय आहे? त्याला घंटा वाजवायची असल्यास ते तसे करवून घेतात. त्याची प्रतिभा पहा, त्यांच्या तोंडून जे शब्द निघतात त्यावर संपूर्ण भारताचा त्यावर विश्वास आहे. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो," असे गुलाब देवी म्हणाल्या.
चंदौसीच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, अनेक नेते देशात अल्पसंख्याकांना पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "ही लोकशाही आहे. येथे कोणीही वक्तृत्व करू शकतो, कोणतेही बंधन नाही. आम्ही याला फारसे महत्त्व देत नाही आणि पंतप्रधान मोदी हे अवतार आहेत. त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. त्यांची इच्छा असेल, तर शेवटपर्यंत ते पंतप्रधान राहतील."
कोण आहेत गुलाब देवी?
गुलाब देवी चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. गुलाब देवी 2022 मध्ये संभलच्या चंदौसी विधानसभेतून चौथ्यांदा विधानसभेत पोहोचल्या आहेत. योगी आदित्यनाथ सरकारच्या मागील कार्यकाळात त्या राज्यमंत्री होत्या. योगी सरकार मध्ये त्यांना माध्यमिक शिक्षण मंत्रीपद मिळाले आहे. पेशाने शिक्षक असलेल्या गुलाब देवी यांनी 1991 मध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता.