अहमदाबाद : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांना अहमदाबादमधील प्रसिद्ध 'सिदी सईद मस्जिदी'लाही भेट दिली. महत्त्वाचं म्हणजे, एकेकाळी मुस्लिम टोपी परिधान करण्यास नकार देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील यावेळी आबेंसोबत मस्जिदीत उपस्थित झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच मोदींनी मस्जिदमध्ये टाकलं पाऊल टाकलं होतं. इतकंच नाही तर मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच परदेशी पंतप्रधानांसोबत रोड शो केला. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी खुल्या जीपमध्ये रोड शो केला. या दरम्यान ५६ कॅमेरे या रस्त्यावर टेहळणी करत होते. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद एअरपोर्टवर जाऊन जपानच्या पंतप्रधानांचं स्वागत केलं. शिंजो यांची गळाभेट घेत मोदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर आबे यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिला गेला. मोदींनी शिंजो आबे यांच्यासोबत ८ किलोमीटरपर्यंत रोड शो केला. हा रोड शो अहमदाबाद एअरपोर्टपासून सुरू होऊन साबरमती आश्रमपर्यंत पार पडला.  


रोड शो नंतर दोन्ही नेते साबरमती आश्रमात दाखल झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून त्यांना श्रद्धांजली दिली गेली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे 'सिदी सईद मस्जिद'मध्ये दाखल झाले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी एखाद्या गाईडप्रमाणे शिंजो यांच्यासमोर मस्जिदचा ऐतिहासिक वारसा मांडला. यावेळी आहे यांची पत्नीदेखील त्यांच्यासोबत होती.