नवी दिल्ली : कधीकाळी वर्ल्ड बॅंक चालवणारे लोक इथे बसायचे, मी तर अद्याप वर्ल्ड बॅंकची बिल्डींगही पाहीली नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बॅंकामध्ये भारत ३० नंबरने पुढे गेला आहे.



१४२ वरुन भारत हा १०० व्या स्थानावर पोहोचला ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नसल्याचे सांगत टीका करणाऱ्या विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला आहे. रॅंकिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी एकत्र मिळून काम करण्याची गरज असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. यांना करायचे काहीच नाही फक्त प्रश्न विचारायचे असतात. मी असा पंतप्रधान आहे ज्याने अजून वर्ल्ड बॅंकेची बिल्डींगही पाहिली नाही परंतु वर्ल्ड बॅंक चालविणारी माणसे इथे बसली आहेत असे विधानही त्यांनी यावेळी केले. 



गेल्या तीन वर्षांपासून सरकार कारभार सुलभ, व्यवस्थित चालण्यासाठी काही निर्णय घेत आहे. जीएसटीदेखील याचेच एक पाऊल आहे. यात दोष असतील तर सोडविण्यासाठी मार्ग सुचविणे गरजेचे आहे. सर्व सर्वांची ताकद लागली तर काम उत्तम होईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.