नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवन परिसरात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आहेत. 2014 प्रमाणेच मोदी सरकारचा यंदाचा शपथविधी सोहळा भव्य ठरला आहे. या सोहळ्याला जवळपास 6000 पाहुण्यांची उपस्थिती लावली आहे. परदेशातून बांगलादेश, श्रीलंका, म्यांमार, थायलंड, नेपाळ आणि भूटानचे प्रमुख उपस्थित आहेत. याशिवाय सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- देवश्री चौधरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- कैलास चौधरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- प्रतापचंद्र यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- रामवेश्वर तेली यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- सोम प्रकाश यांनी घेतली  राज्यमंत्रीपदाची शपथ 


- रेणुका यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- व्ही मुरलीधरन यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- रतनलाल कटारिया यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- नित्यानंद राय यादव  यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- सुरेश अंगडी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- अनुराग ठाकूर यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ   


- संजय धोत्रे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  


- डॉ. संजीव बाल्यान यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  


- बाबुल सुप्रियो यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  


-साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


-रामदास आठवले यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ     


-पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ    


-किशन रेड्डी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ    


-रावसाहेब दानवे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ   


- कृष्ण पाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  


-व्ही के सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


- अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


-अश्वनी चौबे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ


-फग्गन सिंह कुलस्ते यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ  


-मनसुख मंडाविया यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ 


-हरदीप  सिंह पुरी यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ


-राज कुमार सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ


-प्रहलाद सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ    


-किरण रिजिजू यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ    


-डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ       


-श्रीपाद नाईक यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ      


-राव इंद्रजित सिंह यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ     


-संतोष गंगवार यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची  शपथ     


-गंजेद्रसिंह शेखावत यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ    


- गिरीराज सिंग यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ   


-अरविंद सावंत यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ   


- डॉ.महेंद्रनाथ पांडे यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ   


-प्रल्हाद जोशी यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ   


- मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ  


- धर्मेंद प्रधान यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ 


-पीयूष गोयल यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ 


-प्रकाश जावडेकर यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ  


 -डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ 


-स्मृती इराणी यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


-अर्जुन मुंडा यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


-रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


 - सुब्रमण्यम जयशंकर यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


 - थावरचंद गेहलोत यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


 -हरसिम्रत कौर यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ 


 -रविशंकर प्रसाद यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- नरेंद्रसिंह तोमर यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- रामविलास पासवान यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- निर्मला सीतारमण यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- सदानंद गौडा यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- नितीन गडकरी यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- अमित शहा यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ


- पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.


- पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला व्यापार, सिनेमा, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती दिसते आहे.


- जेडीयू नाराज असल्याची माहिती मिळते आहे. नितीश कुमार यांनी जेडीयू सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. जेडीयूला एकच मंत्रीपद दिलं जात असल्याने नाराज असल्याची माहिती समोर येते आहे. सरकारवर नाराज नाही. एनडीएसोबत पूर्णपणे सगळे उभे आहोत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 


- अपना दल देखील मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं कळतं आहे.


- सुषमा स्वराज हे मंत्री बनणार नसल्याचं समोर येतं आहे. 


06.00 : पंतप्रधान मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा आणि मग नितीन गडकरी हे शपथ घेतील.


04.25 : पंतप्रधान मोदींची चाय पे चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात आपल्या मंत्रीमंडळात ज्यांचा समावेश केला जाणार आहे. अशा नेत्यांना भेटणार आहेत. यासाठी आधीच सर्व मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयात ४.३० वाजता बैठकीसाठी येणासाठी फोनवर सांगण्यात आलं आहे.


03.10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बैठक बोलावली असून ते भाजपचे नवे मंत्री आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत. भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. 


02.00 : फोनच्या प्रतिक्षेत मंत्री


नरेंद्र मोदी कॅबिनेटचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. ज्यांना ज्यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे. अशा नेत्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन केले जात आहेत. त्यामुळे सगळेच इच्छूक नेते फोनच्या प्रतिक्षेत आहेत. 


आतापर्यंत अर्जुन मेघवाल, रामदास आठवले, मुख्तार अब्बास नकवी, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद यांना फोन करण्यात आला आहे.


01.05 : मंत्र्यांसोबत मोदींची 'चाय पे चर्चा'


पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासआधी नरेंद्र मोदी हे त्यांच्या नव्या मंत्रिमंडळासोबत चर्चा करणार आहेत. संध्याकाळी साडे चार वाजचा याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही चाय पे चर्चा होणार आहे.


12.55 : रावसाहेब दानवे यांना मंत्रीपद मिळणार


महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याचं कळतं आहे. त्यांना कोणता विभाग मिळतो याबाबत उत्सुकता आहे.


12.40 : हरसिम्रत कौर बादल आणि बाबुल सुप्रियो यांना मंत्रीपद



12.00 : अमित शहा आणि मोदींमध्ये दीड तास चर्चा


अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक संपली आहे. पण जवळपास दीड तास ही बैठक चालली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक संपल्यानंतर अमित शहा आता भूपेंद्र यादव यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.


11.30 : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीला पोहोचले



11.40 : म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष नवी दिल्लीत दाखल



10.30 : दिल्लीत पोहचले बंगालमधील भाजप कार्यकर्ते


बंगालमध्ये मारले गेलेले भाजप कार्यकर्त्यांचे कुटुंबियांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला बोलवण्यात आलं आहे. भाजप कार्यकर्त्यांची ट्रेन दिल्लीला पोहचली आहे.


9.00 : पंतप्रधान मोदींनी शहिंदांना श्रद्धांजली दिली