नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांशी संवाद साधला यात, मोदींनी खासदारांशी खालील मुद्यावर चर्चा केली आहे. यामध्ये 14 एप्रिल ते 5 मे दरम्यान भाजपचे लोकप्रतिनिधी 20 हजारांपेक्षा अधिका गावात एक दिवस मुक्काम करणार आहेत. या काळात भाजपने ग्रामीण भागाशी घेतलेले निर्णय पोहचवणार आहेत. पण नेमकी आज ऑडीओ ब्रीजमध्ये खासदारांशी नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मुद्यावर चर्चा केली याची उत्सुकता लागली होती. तर खालील मुद्यात पाहा, नरेंद्र मोदी यांनी खासदारांसोबत बोलताना काय म्हणाले.


नरेंद्र मोदी म्हणाले, 


- उद्या प्रत्येक मतदारसंघात खासदारांनी उपवास करायचा आहे. जास्तीत जास्त लोकांना उपोषणाला बोलवा.


- विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे संसदेत अनेक समस्या मांडता आल्या नाही, हा मुद्दा लोकांना पटवून द्या.


- ज्या भागातील समस्या संसदेत मांडल्या जाणार होत्या त्या समस्या आता जनतेत जाऊन मांडाव्या.


- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत.


- स्वच्छतासाठी मानसिकता बदलने गरजेचे आहे. लोकांना प्रोत्साहित करा.


- नरेंद्र मोदी ॲप मतदारसंघातील लोकांना डाऊनलोड करायला सांगा.


- आज ऑडीओ ब्रीज झाला.


- २२ एप्रिल रोजी ‘व्हीडीओ ब्रीज’ द्वारे सर्व खासदार आणि आमदारांशी संवाद साधणार.