Har Ghar Tiranga Abhiyan, PM मोदी ट्वीट करत म्हणाले...
स्वातंत्र्याचा (Independence day 2022) अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga ) मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला.
मुंबई: स्वातंत्र्याचा (Independence day 2022) अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga ) मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला. अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आणि प्रभात फेऱ्या काढून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यांत राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी, विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभर उत्साहरंग उसळला असून देशाच्या अनेक भागांचा आसंमत तिरंगी रंगांत न्हाऊन निघाला आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi tweet) यांनी ट्विट करत हर घर तिरंगा मोहिमेला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे मला आनंद झाला आहे असे म्हणाले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेला (Har Ghar Tiranga campaign) कालपासून (13 ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या या आवाहनास विविध राज्यातील सर्वच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जे लोक या मोहिमेत सहभागी झाला असेल ते हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनानिमित्त केंद्राच्या हर घर तिरंगा मोहिमेला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे मला आनंद झाला आहे. विविध क्षेत्रातील लोक या मोहिमेत विक्रमी संख्येने सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. जे लोक या मोहिमेत सहभागी झाले आहेत त्यांनी harghartiranga.com वर तिरंग्यासोबतचे त्यांचे फोटो शेअर करून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात.