लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक लढणार आहेत... याबद्दलच नरेंद्र मोदी यांनी काही बोलण्या अगोदरच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यासंबंधित प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीतही वाराणसी मतदारसंघातूनच निवडणुकीला उभे राहतील. दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून त्यांचा उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही, असंही शहांनी स्पष्ट केलंय. 


'टाईम्स नाऊ'शी बोलताना अमित शहा यांनी हे विधान केलंय. उत्तरप्रदेशात एसपी-बीएसपीनं केलेल्या हातमिळवणीमुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. इथं पुन्हा एकदा भाजपचं प्रचंड बहुमतानं निवडून येईल, असं अमित शहांनी म्हटलंय.