नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. पाच दिवसांच्या य़ा दौऱ्यात ते  इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरला भेट देणार आहेत. या दौऱ्यात सिंगापूरमध्ये गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. त्याप्रमाणे मलेशियाची राजधानी क्लावलंपूरमध्ये मोदी जगातले सर्वात वृद्ध पंतप्रधान महाथेर मोहम्मद यांची भेट घेणार आहेत. ही भेट ३१ मे रोजी होणार आहे.