लखनऊ: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात Citizenship amendment)उत्तर प्रदेशात आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचे बळी गेले आहेत. मात्र, शनिवारी फिरोजाबादमध्ये आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. यावेळी विजेंद्र कुमार या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला. विजय कुमार यांचे दैव इतके बलवत्तर होते की, गोळीने बुलेटप्रुफ जॅकेट भेदूनही त्यांना इजा झाली नाही. त्यांनी वरच्या खिशात ठेवलेल्या पाकिटात ही गोळी अडकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादमध्ये CAA विरोधी आंदोलकांची पोलिसांवर तुफान दगडफेक


या घटनेनंतर मला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया विजय कुमार यांनी व्यक्त केली. आम्ही दगडफेक करणाऱ्या जमावाचा पाठलाग करत होतो. त्यावेळी माझ्यावर गोळी झाडण्यात आली. ती गोळी माझ्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये शिरली. मात्र, गोळी माझ्या छातीत शिरली नाही कारण मी खिशात पाकीट ठेवले होते. या पाकिटात शंकराचा फोटो होता, असे विजेंद्र कुमार यांनी सांगितले.




मात्र, विजेंद्र कुमार यांचे सहकारी असलेले धर्मेंद्र तेवढे सुदैवी ठरले नाहीत. आंदोलकांपैकी एकाने झाडलेली गोळी त्यांच्या पायावर लागली. सध्या धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी अहमदाबादमध्येही हिंसक जमावाने पोलिसांना घेरून त्यांच्यावर तुफान दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये पोलीस उपायुक्तांसह जवळपास १९ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. 


CAA विरोधी आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.