मुंबई : जगात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरूच आहे, दरम्यान लसीकरण मोहीम सर्वत्र पूर्ण वेगाने सुरू आहे. भारतात आतापर्यंत 20 कोटींहून अधिक लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत आणि त्यांच्याकडे 1.84 कोटी पेक्षा जास्त लसी अद्याप उपलब्ध आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या तीन दिवसांत सुमारे 51 लाख अधिक लसी मिळतील. सध्या भारतात दोन स्वदेशी लसींशिवाय, रशियाची स्पुतनिक व्ही (Sputnik V) लसदेखील आली आहे. दरम्यान, Nasal Spray Covid Vaccine वरही काम सुरू आहे.


7 लसीवर काम प्रगतीपथावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांचा असा विश्वास आहे की, नाकाद्वारे दिली जाणारी व्हॅक्सिन (Nasal Spray) कोरोना विरेधात लढा देण्यासाठी एक मोठे शस्त्र सिद्ध होईल. या लसीचा केवळ एक डोस प्रभावी असेल, परंतु ही लस कधी येईल असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यापूर्वी WHO ने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 7 Nasal Spray Covid Vaccine वर काम सुरू आहे. त्यांच्या क्लिनिकल चाचण्या यूके, अमेरिका, भारत आणि चीन यासारख्या देशांमध्ये सुरू आहेत.


त्यांचे काय फायदे आहेत?


तज्ञांच्या मते, नाकातून देण्यात येणारे नोझल स्प्रे कोविड लस म्हणून अधिक प्रभावी ठरेल. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ही गेम चेंजर ठरु शकते. या स्प्रे वापर केल्यास संक्रमणाचा धोका कमी होईल. या स्प्रेचा वापर मुलांसाठी देखील करण्यात येऊ शकतो आणि त्याची चाचणी सध्या सुरु आहे. यामुळे ट्रान्समिशन साखळी खंडित होईल. श्वसन संसर्गाचा धोका देखील कमी होईल.


कोण कोणत्या लसींवर काम चालू आहे?


भारत बायोटेक


भारत बायोटेक नोझल स्प्रेवर लस काम करत आहे. डिसेंबरपर्यंत या लसीचे 10 कोटी डोस तयार होतील अशी अपेक्षा आहे. या लसींची क्लिनिकल चाचणी सुरू आहे.


सीरम  इन्स्टिट्यूट


सीरम इन्स्टिट्यूट (SII) च्या संयुक्त विद्यमाने कोडाजेनिक्स (Codagenix) ही अमेरिकन कंपनी इंट्रानोझल व्हॅक्सिन COVI-VAC वर काम करत आहे. ही देखील सिंगल डोस लस आहे.


ऑल्टइम्यून


अमेरिकन कंपनी ऑल्टइम्यून (Altimmune) देखील अ‍ॅडकोव्हीड (AdCOVID) नावाची लस तयार करत आहे. जी नाकाद्वारे दिली जाईल. ही लस क्लिनिकल चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे.


रोकोटे लॅबोरेटरीज


फिनलँड-आधारित रोकोट लॅबोरेटरीज देखील नोझल लसींवर काम करत आहेत.


SaNOtize-


कॅनडामधील सॅनोटाइज (SANOtize) चा ब्रिटेनमध्ये चाचणीचा दुसरा टप्पा यशस्वी झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता कंपनी भारतात प्रवेशासाठी पार्टनर शोधत आहे.