जर तुम्ही शेअर बाजारात (share market) गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे (flipkart) सह-संस्थापक सचिन बन्सल (Sachin Bansal) यांच्या नवी टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लॉन्च होणार आहे. नवी टेक्नॉलॉजीज (Navi Tech ipo) लवकरच रु. 3,350 कोटींचा IPO घेऊन येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजार नियामक सेबीने नवी टेक्नॉलॉजीजला IPO लाँच करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये सेबीकडे (SEBI) आयपीओ आणण्यासाठी ड्राफ्ट पेपर (DHRP) दाखल केला होता.


नवी टेक्नॉलॉजीजने आयपीओमधून मिळणारे पैसे कर्ज आणि विमा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरण्याची योजना आखली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना वैयक्तिक, गृहकर्ज तसेच आरोग्य विम्यासाठी काम करते. ICICI सिक्युरिटीज, BofA सिक्युरिटीज आणि Axis Capital, Credit Suisse Securities (India) Pvt Ltd आणि Edelweiss Financial Services हे पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.


सचिन बन्सल यांनी सह-स्थापना केलेली आणि प्रमोट केलेली नवी टेक्नॉलॉजीज ही तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक उत्पादने आणि सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, नवी हे डिजिटल कर्ज देणारे अॅप आहे, ज्यामध्ये पेपरलेस प्रक्रियेद्वारे 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फार कमी वेळात घेतले जाऊ शकते. मायक्रोफायनान्स सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी, नवी ने 2019 मध्ये चैतन्य इंडिया फिन क्रेडिटला 739 कोटी रुपयांना ताब्यात घेतली आहे. चैतन्यने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी अर्ज केला आहे. ही कंपनी तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती आणि सचिन बन्सल यांनी कंपनीमध्ये सुमारे 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.


शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक जोखमीची असते. वरील बातमीत दिलेली माहिती कोणताही गुंतवणुकीचा सल्ला किंवा खरेदी विक्रीची टीप नाही . तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.