Pm Narendra Modi security breach : पंजाबमधील हुसैनीवाला इथं बुधवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाच्या प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरुन भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकाम्या खुर्च्यांमुळे रॅली रद्द
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा (PM Modi Security Breach) दावा म्हणजे नाटक असल्याचं म्हटले आहे. रिकाम्या खुर्च्यांमुळे रॅली रद्द करण्यात आल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे.


एडीजीपींच्या पत्रातून मोठा खुलासा
पंजाबच्या एडीजीपीच्या पत्रानुसार पंजाब सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आधीच कल्पना होती. एडीजीपींनी पत्रात 5 तारखेला पावसाबरोबरच शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, त्यामुळे विशेष सुरक्षा व्यवस्था करावी असं लिहिलं होतं. 


पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल
पंजाबच्या एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दावा केला होता की, त्यांना पीएम मोदी रस्त्याने फिरोजपूरला जात असल्याची कोणतीही माहिती नाही.  पीएम मोदींच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता नसल्याचंही सीएम चन्नी यांनी म्हटलं होतं. 


सुप्रीम कोर्टात उद्या होऊ शकते सुनावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणई उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.