बस्तर : छत्तीसगडच्या सीमेनजिक महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात रविवारहून चालवण्यात येणाऱ्या नक्षलवाद्यांविरुद्ध व्यापक अभियानानंतर या अभियानात सुरक्षा यंत्रणेकडून ठार झालेल्या नक्षलवाद्यांची  संख्या 39 वर गेलीय. एनडीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी भामरागडच्या जंगलात पोलिसांची गस्त सुरु होती. याच दरम्यान टीमला सूचना मिळाली की महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर इंद्रावती नदीजवळ जंगलात मोठ्या संख्येत नक्षलवादी जमा झालेत. परंतु, या माहितीनंतरही पोलिसांकडे आणि सुरक्षा दलाकडे नक्षलवाद्यांच्या ठिकाणाची माहिती मात्र नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, ताडगाव पोलीस स्टेशन भागातील नदीच्या दुसऱ्या बाजुला 50-60 लोकांचा नाश्ता मागवण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हाती आली. इतक्या मोठ्या प्रमाणात नाश्ता मागवणारे नक्षलवादीच असू शकतात, हे समजण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना वेळ लागला नाही. त्यानंतर तात्काळ गावाच्या आजुबाजुला ऑपरेशनला सुरुवात झाली. या दरम्यान मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. 


60 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण 


मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूरमध्ये अबुझमाडच्या 60 नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं. बस्तर आयजी विवेकानंद सिन्हा यांच्यासमोर 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांमध्ये 40 तरुण आणि 20 तरुणींचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या नीतीला कंटाळून या सर्वांनी नक्षलवादी संघटनांचा हात सोडून सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. सरेंडर करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाकडून मदत आणि पुनर्वसन योजनेचा फायदा मिळणार आहे.