नागपूर:  माओवाद्यांचा थिंकटँक असलेल्या  प्राध्यापक साईबाबाला सोडवण्यासाठी माओवादी योजना आखत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या साईबाबाला आंध्र प्रदेशातल्या कारागृहात हलवून तिथून त्याची सुटका करण्याची माओवाद्यांची योजना असल्याचे उघड झाले आहे.याबाबत एक पत्र कॉम्रेड सुरेंद्र याने पॉलिट ब्युरोच्या सदस्यांना पाठवले होते. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर हे पत्र  सादर करण्यात आले.