IAS श्रुती शर्मा यांनी सांगितलं UPSC पास होण्याचं गुपित; जाणून घ्या
UPSC Exam Tips : NCERT चे पाठ्यपुस्तकांमुळे तुमच्या प्रत्येक विषयाची तयारी ही उत्तम होते. हे फक्त यूपीएससी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शिकण्यासाठी आणि चांगली उत्तरे लिहिण्यासही देखील मदत करतात.
UPSC Exam Tips : IAS श्रुती शर्मा यांनी UPSC च्या नागरी सेवा परीक्षा 2021 मध्ये AIR 1 मिळवला होता. त्या दिल्लीच्या सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासाची पदवी घेतल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आधुनिक इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. यादरम्यान, श्रुती शर्मा या जामिया मिलिया इस्लामियाच्या निवासी यूपीएससी प्रीपरेटरी कोचिंग अकादमीमध्ये सामील झाल्या आणि तिथूनच त्यांनी यूपीएससीची तयारी केली. चार वर्षांपासून त्या UPSC च्या नागरी सेवा परीक्षेच्या परीक्षेची तयारी करत होत्या. पण, परीक्षेचा हा त्याचा दुसरा प्रयत्न होता.
Start from the Basics
श्रुतीयांनी आपला बराचसा वेळ NCERT च्या पुस्तकांसाठी दिला. त्यांनी सर्वात आधी NCERT ची पुस्तके वाचली आणि त्यानंतरच त्यांनी स्टँडर्ड स्टडी मटेरियलकडे धाव घेतली. यामागचं कारण म्हणजे, NCERT तुम्हाला प्रत्येक विषयाची सखोल माहिती मिळते. हा फक्त यूपीएससी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा एक भाग शिकण्यासाठीचं नाही तर समस्यांचं अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करण्यासाठी आणि त्याचबरोबर उत्तम उत्तरे लिहिण्यासही याची मदत होते.
Newspapers aren’t Optional
या परीक्षेचे कोचिंग इन्स्टिट्यूट तुम्हाला याची नक्कीच खात्री देतील की त्यांची चालू घडामोडींचं कंपाईल तुम्हाला UPSC परीक्षेत पुढे नेण्यासाठी पुरेसं आहे. श्रुती यांच ठामपणे मत आहे की वर्तमानपत्रे आवश्यक आहेत आणि ती वगळणं तुम्हाला परवडणारं नाही. श्रुती हे वर्तमानपत्र वाचण्यासोबतच स्वतःच्या नोट्स देखील बनवायची सवय होती. यामुळे त्यांच्या तयारीला चांगली धार मिळाली.
Patience and Consistency Wins the Race
UPSC क्रॅक करणं ही एक मॅरेथॉन आहे. तुमच्या कोणत्याही यशासाठी संयम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही दररोज किती तास अभ्यास करत आहात याकडे जास्त लक्ष देऊ नका. त्याऐवजी, तुमच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा.
Previous Year Questions are your Bible
मागच्या वर्षांच्या प्रश्नांच विश्लेषण करून आपली तयारी सुरू करायला हवी. प्रत्येक विषयाकडेही एका विशिष्ट पद्धतीने पाहावं लागतं. मागील वर्षांचे प्रश्न वाचून तुम्हाला ते समजेल.
Draw your Own Path
या परीक्षेसाठी तुमची स्वतःची रणनीती तयार करा. प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमकुवतता ही वेगवेगळी असते. तुमच्या यशाचा तुमचा स्वतःचा वैयक्तिक मार्ग असायला हवा.