नवी दिल्ली : पगारातून दर महिन्याला टॅक्स कापला जाण्याचा वैताग आला असेल तर टॅक्स सूट मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय वापरा. कोणत्या पर्यायातून टॅक्स सूट मिळेल याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. टॅक्स वाचवण्यासोबतच चांगला रिटर्न सुद्धा मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्याय 1
टॅक्स वाचवण्याचा सर्वात सामान्य आणि चांगला पर्याय म्हणजे फॉर्म 80 सी यामध्ये 1.5 लाक रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळते. या सेक्शनमद्ये तुम्ही PPF, LIC सारख्या प्रोडक्टमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्ससुद्धा वाचेल आणि रिटर्न्स  सुद्धा मिळतील.


पर्याय 2
टॅक्स वाचवण्याचा दुसरा पर्याय नॅशनल पेंशन स्किममध्ये गुंतवणूक करणे होय. NPSमध्ये गुंतवणूक केल्याने चांगल्या रिटर्न्ससोबतच टॅक्समध्ये सूटदेखील मिळते.


पर्याय 3
टॅक्स वाचवण्यासाठी 80 CCD(2D)मध्ये मिळणारी सूट होय. वेगवेगळ्या पेंशन फंडमध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवता येतो.


पर्याय 4
सेक्शन 24 B तुमच्या अडचणी सोडवू शकते. घर खरेदी किंवा बनवण्यासाठी होम लोन घेऊन त्यामाध्यमातून टॅक्स सूट मिळवता येऊ शकते. लोनच्या व्याजावर टॅक्समधून सूट मिळते.


पर्याय 5 
सेक्शन 80 D मध्ये हेल्थ इंश्युरन्सचा प्रीमियम दाखवून टॅक्समध्ये सूट मिळवता येते.


पर्याय 6 
सेक्शन 80 U अंतर्गत 40 टक्के आणि 80 टक्के दिव्यांगासाठी टॅक्समध्ये सूट मिळते. 


पर्याय 7 
सेक्शन 80G अंतर्गत टॅक्सपेअर्स दान/चॅरिटी करूनही टॅक्समध्ये सूट मिळवू शकता.