नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत जागा देण्यात आली होती. यावर शरद पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या नाराजीमुळे शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचे सांगण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री आणि स्वतंत्र खात्याचे मंत्री शपथ घेतली. टीम मोदीमध्ये एकूण ५७ मंत्री असणार आहेत. या सगळ्या मंत्र्यांनी  पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कॅबिनेट मंत्री


-  राजनाथ सिंह 
-  अमित शाह
-  नितीन गडकरी, महाराष्ट्र
-   डी व्ही सदानंद गौडा
-   निर्मला सीतारामन
-  रामविलास पासवान
-  नरेंद्रसिंह तोमर
-  रविशंकर प्रसाद
-  हरसिमरत कौर बादल
-  थावरचंद गहलोत
-  एस जयशंकर, माजी परराष्ट्र सचिव 
-  डॉ. रमेश पोखरीयाल निशांक
-  अर्जुन मुंडा
-   स्मृती इराणी
-   डॉ. हर्षवर्धन
-  प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र
-  पीयूष गोयल, महाराष्ट्र
-  धर्मेंद्र प्रधान
-  मुख्तार अब्बास नक्वी
-   प्रल्हाद व्यंकटेश जोशी
-  महेंद्रनाथ पांडे 
-  अरविंद सावंत - महाराष्ट्र
-  गिरीराज सिंह
-   गजेंद्रसिंह शेखावत